चंद्रपूर शहरातील गोंडकालिन पाणी व्यवस्थापन
चंद्रपूर:- १८८७ काळात जवळ जवळ ६९.९४ सेंटीमीटर पाऊस पडायचा, १२ महिने नद्या वाहायच्या, लोकसंख्या कमी, शेतीचे क्षेत्र कमी, त्याही काळात पाणी व्यवस्थापनावर भर देण्यात आला. पाणी व्यावास्थापानाकरता असे करण्यात आले कि जेवढी जंगले कापून गावे, तलाव बसवण्यात येतील तेवढ्या जमिनीचा त्या गावाचा जमीनदार म्हणजेच मालगुजार तो व्यक्ती असायचा. म्हणून त्यांनी आदेशच काढला कि स्थानिक लोकांनी सहभागी होऊन जंगल कप व तेवधेच तलाव बनवा आणि तिथे शेती करा, गाव वसवा, जो जेवढ्या गावात तलाव बनवणार तो त्या गावाचा तो तुकुमदार, मालगुजार म्हणजेच मामा तलाव ज्याला म्हणतात (माजी मालगुजार तलाव) असे त्याचे नाव प्रचलित झाले. असे चंद्रपूर, गडचिरोली,भंडारा जिल्ह्यात तलाव आहेत. जसे आत्ताच्या चंद्रपूर जिल्ह्यातील गाव विलोडा येथील मालगुजार बोठले, मुधोलीचे मालगुजार नन्नावरे आसे प्रत्येक गावात मामा तलाव आहेत. हे मालगुजार गोन्दाकालीन राजसत्तेत जमीनदार असत. ...